पिंपळगाव नाकले माजलगाव तालुका जिल्हा बीड येथील घटना आहे सहा वर्षीय बालकाच्या गळ्याला फास बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आपल्या शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला लहान बहिणीसाठी बांधलेल्या झोक्यात आपणही जोखं घेऊ असा विचार घेऊन झोका खेळण्यास गेलेला बाळराजे भगत नावाचा बालक मृत्यू पावलेला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यात शेतात झोका खेळण्यासाठी गेले असल्याने पहिली वर्गात शिकत असलेला बाळराजे भगत 29 ऑक्टोबर मंगळवारी रोजी गेलेला होता आई व आजी कापूस वेचण्यात व्यस्त असताना बाळराजे भगत हे बालक पाण्याच्या कॅनवर चढून झोक्यात चढला व झोका खेळायला सुरुवात केली इतका फिरवला की झोका विरुद्ध दिशेने झपाट्याने फिरू लागला व बालकाला फाशी बसली आणि तो तेथेच बेशुद्ध अवस्थेत पडला लहान बहिणीला पाणी मागितला असल्याने बहिणीने पाणी नाही दिले व आईला आवाज दिले तिथे ते प्रकार उघडीस पडला.
बेशुद्ध पडल्या अवस्थेत माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात त्याला नेले असल्याने तेथे त्याला फरक नाही पडला व पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आले तरी देखील त्याची प्रकृतीने साथ नाही दिली व दिवसानंतर बुधवारी पहाटे त्याची प्राणज्योत मावळली व बुधवारी दुपारी चिमुकल्या बाळराजेवर अत्यसंस्कार करण्यात आले.
आपणही लहान लेकरं बाळांना एकट्यात सोडून जाऊ नये असे या भय्या व अतिशय दुखद घटना आपल्याला शिकवण देऊन जात आहे.