बीड मधील वैद्यकीय अधिकारी चे ऑनलाइन चोरलेले पैसे मिळाले परत..

beed cyber news
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अचानक मोबाईल मध्ये लिंक आली आणि त्या लिंक वर क्लिक केल्याने खात्या मधील 50 हजार रुपये गायब झाले.

ही घटना सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी शरद गंगाधर फटाळे यांच्यासोबत तीन जानेवारीला घडली त्यांच्या मोबाईल मध्ये अचानक एक मेसेज आला त्याच्यामध्ये लिंक त्यांनी उघडली व उघडताच बँकेची साईट दिसली त्यावर त्यांनी पुढे क्लिक केले त्यांना असं वाटलं की ही काहीतरी बँकेची लिंक किंवा फॉर्म असावा त्यांनी तो पुढे जाऊन भरला व भरल्यानंतर त्यांची अचानक खाद्यातून पन्नास हजार रुपये गायब झाले असा सायबर फ्रॉड त्यांच्यासोबत झाला.

नंतर त्यांनी ताबडतोब सायबर पोलिसांची मदत घेतली तक्रार केली व सविस्तर माहिती समोरच्यांना दिली ही माहिती देता क्षणी सायबर पोलीस बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगड व अप्पर अधीक्षक सचिन पांढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास गात उपनिरीक्षक आर जी कासले यांनी ऑनलाइन चेक करून कोणत्या खात्यातून पैसे कपात होऊन कोणत्या खात्यात जमा झाले हे चेक केले व सविस्तर माहिती घेऊन यशस्वीरित्या 50 हजार रुपये परत मिळवले.

बीड पोलीस ऑनलाईन सायबर क्राईम बद्दल त्यांची जागे जागी प्रशंसा होत आहे तरी आपल्या सोबत कुठेही कधीही ऑनलाइन सायबर क्राईम झाल्यास लवकरात लवकर सायबर पोलीस बीड पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे जेणेकरून लवकरात लवकर आपले गमावलेले पैसे परत मिळवता येते समोरच्याचा अकाउंट फ्रिज करून त्याला ते पैसे काढता येत नाही व आपल्याला आपले पैसे परत मिळवता येते फक्त आपल्याला करायचं असं असतं की लवकर आपण ते गेलेले पैसे परत मिळावे यासाठी जितके लवकर होईल तितके लवकर तक्रार करणे गरजेचे असते समोरच्यांनी एकदा जर ते पैसे काढून खर्चविले तर ते पैसे मिळवणे अवघड जाते असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *