Hambirrao Mohite Scheme 2024 छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ज्याला आपण सारथी असा म्हणतो याच्यावतीने मराठी कुणबी विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुवर्ण अशी संधी आहे या संधी आणि योजना काय आहे या माहिती घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.
सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प राबविला जात आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबत विद्या वेतनही मिळणार आहे.
यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले असले तरी 20 ऑगस्ट पर्यंत याची हार्ड कॉपी विभागीय कार्यालयास सादर केली जाऊ शकते.
Hambirrao Mohite Scheme | कोणाला याचा लाभ घेता येणार?
छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यालय मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील मोडी लिपी प्रशिक्षण संस्थेद्वारे कुठलीही शाखेतील पदवीधर 40 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी मोडी लिपी सर्टिफिकेट कोर्सची प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Hambirrao Mohite Scheme | कुठे करायचा अर्ज ?
या प्रशिक्षणाकरिता संपूर्ण माहिती मार्गदर्शक तत्वे ऑनलाईन अर्ज कुठे करायचा भरण्याकरिता सूचना व हार्ड कॉपी खालील दिलेल्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Hambirrao Mohite Scheme | Sarthi website
https://sarthi-maharashtragov.in/
असे असले तरी विभागीय कारल्यास हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मदत 20 ऑगस्ट पर्यंत आहे या तारखे मध्ये बदल असल्यास सारथी या संकेतस्थळावर सूचित करण्यात येणार आहे.
Hambirrao Mohite Scheme | महिन्याला विद्या वेतन किती मिळणार आहे?
यासाठी महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे पुणे कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर येथील विद्यापीठ व जिल्हा मुख्यालयाचा बाहेरील कागदपत्रांच्या छाननी द्वारे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
Hambirrao Mohite Scheme | खरंच लाभ होणार आहे का याचा निकष काय आहे?
मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी असावा उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचा डोमिसाईल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर असावा.
जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा मागील तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र असावे.
मराठा जातीचे उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र नसल्यास पी डब्ल्यू एस एस सी प्रमाणपत्र असावे निवड केलेल्या कोर्स साठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्थ उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.