या वर्षाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तब्बल 82 टक्के माजलगाव धरण भरला असून लवकरच माजलगाव धरण 100% भरू शकतो व याच अनुषंगाने हवामान खात्याने बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
ही माहिती समजतात माजलगाव येथील पाटबंधारे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे असे असले तरी धरण 100% भरल्यानंतर पाणी सोडावे लागणार आहे व नदीकाठातील गावाच्या नागरिकांनी आपले पशुधन नदी पात्रात न सोडता सतर्क राहून काळजी घ्यावे ही सर्व माहिती माजलगावकरांना दिली आहे.
पावसाळा संपला असून माजलगाव धरणाच्या अवतीभवती क्षेत्रात कुठे ना कुठे सतत पाऊस चालूच आहे असे असल्याने हा धरण भरणा काय थांबत नाही त्यामुळे सर्वांनी सतर्कता पाळावी असे आवाहन शासनाच्या वतीने केले आहे.
विशेषतः गोदावरी व सिंदफणा नदीच्या काठातील गावातील नागरिकांना स्वतः आपले पशुधन रस्ते पूल याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन संतोष रुईकर माजलगाव चे तहसीलदार यांनी केले आहे.