ज्ञानराधा मल्टीस्टेट चे मालकीची असलेली तिरूमला ऑइल इंडस्ट्री आपण सर्वांना माहीतच आहे येथे सर्व साहित्य अगदी क्रेन लावून लोकांनी चोरी केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.
जादा अमिष दाखवून लोकांचे ठेवी वर व्याज व गुंतवणूक किंवा व्याज देणारे सुरेश कुठे व अर्चना कुठे यांनी लोकांना चुना लावून त्यांची ठेवी परत न देता लोकांची फसवणूक केल्या प्रकरण पूर्ण महाराष्ट्रभर माहित आहे त्यांचेच मालकीची असलेली तिरूमला ऑइल इंडस्ट्रीज बीड येथील काही चोट्यांनी तिरुमाला कंपनीतील ऑइल बनविणारे सर्व कोट्यवधींचे मशिनरी चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
हे प्रकरण मतमोजणीच्या दिवशी घडलेले असे आढळून आलेले आहे अगदी मशीन सहज कोणत्याही भुरट्या चोरट्यांना सोडता येणारे असे नव्हते तर लोकांनी अगदी क्रेन लावून हे मशिनरी नेऊन गेलेले समोर आले आहे.
कायदेशीर रित्या कोणीही फसवणूक केलेल्या माणसाची प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे दिले जातात पण अशी जर कंपनीमध्ये चोरी होत असेल तर ते पैसे परत कसे देणार आणि ते मशीन मार्केटमध्ये भाव कसा मिळणार याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.