मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना संपूर्ण माहिती
जे कोणी स्वखर्चातून तीर्थ दर्शनाला किंवा कोणत्याही देवस्थानी जाऊ शकत नाही अशा व्यक्तींना मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शना योजना जाहीर केली.
या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील लोक ज्यांचं वय म्हणजे जे वयाने वयस्कर आहे अशा व्यक्तींसाठी फ्री मध्ये जाणे त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेन आणि नाश्त्यासहित अन्न आणि शुद्ध पिण्याचे पाणी हे राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात येईल.
ज्या ठिकाणी तीर्थ दर्शन किंवा धार्मिक स्थळ असेल अशा ठिकाणी गरीब आणि जे जाऊ शकत नाही अशा वयस्कर लोकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड हे मिळून तिथं राहण्याची व्यवस्था करतील.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल असे असले तरी ही योजना फक्त सीनियर म्हणजे वयस्कर लोकांसाठीच राहील.
याच्या अगोदर अशी योजना दुसरे काही राज्यांमध्ये लागू आहे जसे की मध्य प्रदेश झारखंड आणि दिल्ली.
ही योजनेसाठी काही कागदपत्र लागणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी आहे म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज भासणार आहे तरी आपण आपल्या घरातील वयस्कर माणसांसाठी हा सर्टिफिकेट काढून ठेवावे आणि वार्षिक उत्पन्न देखील त्यांचा तहसील कार्यालय मधून काढून ठेवावे.