बीड शहराच्या लाचलुच प्रतिबंधक विभागाने बालकल्याण समितीच्या सदस्य सुरेश प्रभाकर राजहंस याला बारा हजाराची (१२०००/-) लाच घेताना रंगेहात पकडले व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले.
सुरेश प्रभाकर राजहंस राहणार शिंदे नगर बीड वय 40 वर्षे असे या आरोपीचे नाव आहे. व सुरेश प्रभाकर हे बालकल्याण समितीत मानधन तत्वावर कार्यरत आहे.
वास्तविक बालकल्याण समितीच्या सदस्याने 50 हजार रुपयांची मागणी केली होती व तडजोडीनंतर बारा हजार रुपयांवर त्यांचा सौदा झाला होता असे समजण्यात आले.
एका 27 वर्षीय तक्रारदाराने त्यांची मैत्रीण महिला बाल स्वाधारगृहात होती तिला सोडविण्याकरिता दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता त्यावरील सुरेश प्रभाकर राजहंस यांनी त्याला सोडविण्याकरिता ही लाच मागितली असे समजते व लाज न देता तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो म्हणजेच लाज लोचपत प्रतिबंधक पथक या कार्यालयाला आपली तक्रार कळवली त्यानंतर लगेचच लाच लोकप्रतिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून नगर रोडवरील बालकल्याण समिती कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली व बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश प्रभाकर राजहंस यांना रंगीहात पकडले व गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस अमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे, आदींनी केली.