घराणेशाही तर राजकारणात चालतच असते त्यात नवल काही नाही नवीन चेहऱ्याला संधी न देणे हे काम घराणेशाही करत असतो यालाच राजकारण म्हणतात त्यात दुमत नाही अशा परिस्थितीतून बाहेर पडून नवीन चेहरा कसा देता येईल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे जात बाजूला ठेवून खरंच आपण प्रमाणिक व अभ्यासू वयक्तीमत्व निवडून देत आहे की नाही याचा विचार केला पाहिजे.
बीड शहराचा विचार केला तर क्षीरसागर कुटुंब घराणे शाही साठी अग्रेसर नाव आहे तसेच गेवराई मध्ये पंडित व पवार परिवार यांचा नाव पुढे आहे माजलगाव मध्ये सोळंके आष्टी मध्ये धस व धोंडे परळी मध्ये मुंडे असे घराणे शाही चालत येत आहे आपण या खराणेशाहीला संपू व नवीन लोक पुढे आणण्याचा काम करू असा संकल्प घेऊन सर्वांनी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.
बीड जिल्ह्यात आज पर्यंत कोणत्या कुटुंबात किती आमदार झाले?
बीड – क्षीरसागर कुटुंब – ३
केज – मुंदडा कुटुंब – ६ सोळंके कुटुंब – १
माजलगाव – सोळंके कुटुंब – ५
गेवराई – पवार कुटुंब – ४ पंडित कुटुंब – ७
चौसाळा – क्षीरसागर कुटुंब – ३
आष्टी – धस कुटुंब – ३ धोंडे कुटुंब – ४
परळी – मुंडे कुटुंब – ३
रेणापूर – मुंडे कुटुंब – ५
वरी दिलेली माहिती व्यतिरिक्त सलग पाच वेळेस आमदार म्हणून निवडून येणारी केज मतदार संघातील विमल मुंदडा आहे सलग मतदारसंघात निवडून येऊनच नव्हे तर सलग तीन वेळेस विमल मुंदडा आरोग्य मंत्रीही राहिलेले आहे.
त्यांच्या निधनानंतर त्यांची सून 2019 पासून नमिता मुंदडा हे आमदार झाल्या आणि दुसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे..
असे असले तरी अनेक वेळी बीड जिल्ह्याने मंत्री राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री ही या राज्याला दिले आहे तरी आज तगत बीड जिल्ह्यातील दुष्काळी परंपरा बीड जिल्ह्यातील मागे असले पण व बीड शहराची सर्वात महत्त्वाची म्हणजेच पाण्याची समस्या आज यह तगत मिटवलेली नाही असेच घराणे शाही चा काय फायदा असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बीड शहराला अनेक वर्षापासून वंचित ठेवलेली म्हणजे ती गोष्ट आहे रेल्वे ज्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे व असे असले तरी फक्त आणि फक्त आश्वासने दिली जातात व कामे केली जात नाही फक्त आपल्या कार्यकर्ते आणि जवळच्या लोकांना मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार व सरकारी कामे देऊन मोठी केली जातात असे गावकरी म्हणत आहे.