महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने दीर्घ प्रवासासाठी “आवडेल तिथे कोठेही प्रवास” या नावाची योजना प्रवासासाठी सुरू केलेली आहे. सविस्तर माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.
एकूण प्रवासासाठी लागणारा खर्च: Rs. 2040.. (दोन हजार चाळीस रुपय)
आवडेल तिथे कोठेही प्रवास या योजनेअंतर्गत 2040 भरून एका आठवड्यासाठी एक पास दिला जातो या पासमध्ये कोणत्याही वेळेस आणि कुठेही आपल्या आवडत्या ठिकाणी फक्त पास देऊन आपल्याला राज्यभरात आपल्या आवडत्या ठिकाणी फिरता येते तरी या योजनेचा भरपूर लाभ घ्या आणि आपला राज्य पूर्ण फिरून काढा.
जे कोणी लहान मुले मुली आहेत ज्यांचा वय पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापेक्षा कमी या वयोगटातील मुलांसाठी अर्ध्या दराने प्रवास करता येतो हे देखील योजना आमलात आहे ही योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या बस स्थानकात जाऊन आवडेल तिथे प्रवास आणि वय चा दाखला दाखवून अर्ध्या दराचा आणि दोन हजार रुपये तिकीट वाली योजनेचा लाभ घ्यावा..
या योजनेअंतर्गत सात व चार असे दिवसांची पास दिले जातात या पास अंतर्गत साधी जलद रातराणी शहरी यशवंती अशा अनेक प्रकारचे बसेस ग्राह्य राहतात.
कुठे बस सेवा बंद असेल किंवा संप असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला या पास अंतर्गत प्रवास करतानाही आला तर आपली दिलेली रक्कम परत मिळते किंवा आपल्या सदर दिलेली दिवसांचा कार्यकाळ वाढवून दिला जातो.