आरोपीला फाशीची मागणी! संस्था संचालकाही सहआरोपी करा|

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माजलगाव शहरात एका शासकीय विद्यालयात त साडेपाच वर्षीय चिमुकलीवर त्याच शाळेतील एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडली असून त्याला शनिवारी पोलिसांनी अटक ही केली व माजलगावकरांनी त्या शिक्षकाला फाशीची मागणी द्या या मागणी करिता सोमवारी माजलगाव बंदची हाक दिली होती असे असले तरी त्याला फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली. 

त्या मोर्चात मोठ्या प्रमाणे लहान मुले व मुली दिसली व सगळे एकत्रित येऊन तहसील कार्यालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याला मागणीचे निवेदन पत्र देऊन त्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली. 

चिमुकलीला फोटो दाखवून आरोपी शिक्षकाची ओळख पटविली व त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्या नाराधाम शिक्षकाला अटक केली त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली व पुढील चौकशी सध्या सुरू आहे आरोपीचे नाव राहुल अंबादास वायखिंडे असे आहे. 

या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व शहरात मोर्चा काढून सर्व व्यापारी नागरिक एकत्रित येऊन आपला काम धंदा बंद करून या मागणीसाठी तहसील कार्यालयात रॅली काढून सहभाग झाले असे असताना संस्था संचालकालाही सह आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Comment