जे कुटुंबाने स्वस्त धान्य साठी इ–केवायसी केली नाही त्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे.
राज्य शासनाने ई केवायसी बंधनकारक केली असून मागील सहा महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत आहे तरी आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात 30 टक्के लाभार्थ्यांनी अद्यापही केवायसी केली नसल्याने त्यांना धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे.
असे असले तरी बीड जिल्ह्यात एकूण 38 टक्के लोकांनीच ई-केवायसी करून घेतली असून बाकीचे लोकांची धान्य बंद होणार आहे.
इ केवायसी साठी 2024 पासून ही मुदत आणि मुदत देण्याची प्रयोग सुरू आहे तरी यासाठी प्रारंभी एक नोव्हेंबर 2024 ची मुदत देण्यात आली होती त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा मदत वाढ दिली असून आता 15 मार्च अंतिम दिनांक आहे.
ज्याचे कुणाचे नाव आपले शिधापत्रिकेत जोडलेले आहे म्हणजेच रेशन कार्ड वर त्या सदर प्रत्येक व्यक्तीला ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा सेवा लाभ मिळणार नाही.
कशी कराल ही इ केवायसी?
ज्यांनी कुणी एक केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी आपल्या परिसरातील कोणतेही स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोरजी ईपॉस मशीनने करून घेऊ शकतात.
म्हणजेच जवळच्या स्वस्त धान्य दुकान म्हणजेच राशनची दुकान वर जाऊन ही ई केवायसी करून घेणे.
ह्या रेशन कार्ड चा उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नाहीच तर इतर अनेक गोष्टी जसे की दवाखान्यामध्ये एखाद्या स्कीम किंवा योजनेचा फायदा घेण्यासाठी व कुठे आपण एकास कुटुंबाचा सदस्य म्हणून पुराव्या देण्यासाठी ही उपयोग होतो तरीही आपण स्वस्थ धान्य घेत नसन तरीही केवायसी करून आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवावे.
बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रत्येक चालू घडामोडी व महत्त्वाची बातमीसाठी जॉईन करा हॅलो बीड लिंक खाली दिलेली आहे व आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व परिवारातील सदस्यांनाही ही मेसेज व माहिती नक्की फॉरवर्ड करा लिंक खाली दिलेली आहे.