संजय गांधी निराधार योजनेत दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये पेन्शन म्हणून अनुदान दिले जाते.
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 122 कोटी निधी वितरित केला आहे.
सदरील निधी प्रत्येकी जिल्ह्या त प्रशासनाकडे सुपूर्द केला असून जिल्ह्याने तालुक्या ठिकाणी तहसीलदारास सुपूर्द केला आहे व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मे ते जुलै 2024 या तीन महिन्यांचे एकत्रित अनुदान लाभार्थ्यांना मिळत आहे.