Krushi Mahotsav Parli 2024 उद्या दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून पाच दिवस महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राज्यस्तरीय कृषी महोत्सव महाराष्ट्राच्या कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेलेला आहे.
Krushi Mahotsav Parli 2024 महोत्सवाचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते होणार आहे.
विद्यापीठांनी लावलेले कृषी क्षेत्रात नवीन नवीन शोध विविध नवीन आधुनिक उपकरणे शासकीय संस्थाचे नवीन उपक्रम विविध उत्पादने याबाबत या महोत्सवात सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल अशी माहिती मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आपला फायदा करून घेण्यासाठी या कृषी महोत्सवात जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा येऊन फायदा घेऊन जाणे.
याच्या व्यतिरिक्त तज्ञ कृषी विभागातील लोक मंचावरून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत जसे की पशु प्रजाती खरेदी करता येणार आहे व नवीन आधुनिक आलेले तंत्रज्ञान यांच्यामुळे आपल्या शेताला फायदा होईल असा मार्गदर्शन तिथे आपल्याला मिळणार आहे.
कृषिमंत्र्यांनी या महोत्सवाचा आढावा एक दिवस अगोदरच घेतला व परळी येथील विश्रामगहात अधिकाऱ्यांसमवेत कृषी महोत्सवांच्या तयारीचा आढावा घेतला यावेळेस बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक अविनाश बारगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील कृषी विभागाचे सहसंचालक दिवेकर मोठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे ज्येष्ठ नेते वाल्मीक कराड तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कृषी महसूल पोलीस अधिकारी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.